दोन दुचाकींना धडक देऊन टँकर सलून व पानटपरीवर धडकला

0

खामगाव (प्रतिनिधी):- भरधाव टँकर चालकाने नांदुरा रोडवरील कोर्टासमोर दोन दुचाकींना धडक देऊन पोबारा केला. मात्र पुढे जाऊन रस्त्यालगत असलेल्या सलून व पानटपर्‍यांवर धडकला. या अपघातात फार मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालकांसह टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजताचे सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  काल गुरूवार रात्री टावर चौकाकडून भरधाव वेगाने येणार्‍या टँकर क्र. एमएच-28-बीबी-3964 च्या चालकाने कोर्टा समोर दोन दुचाकींना धडक दिली. चालकांना उडवले आणि नांदुरा कडे पळून गेला. यावेळी उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्रथम खाजगी व नंतर 108 वर कॉल करून रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात भरती केले. तर काहींनी पोबारा करणार्‍या भरधाव टँकरचा पाठलाग केला. पुढे जाऊन टँकरने चक्क डिवायडर ओलांडून खामगाव – नांदुरा रोडवरील हॉटेल गौरवला लागून असलेल्या सलून व पानपट्टीला धडक मारली. यामधे सलून व पानपट्टी चे मोठे नुकसान झाले आहे.  यावेळी विद्युत प्रवाहीत तारा सुध्दा ट्रकमध्ये गुंतला होता. सुदैवाने तेथे कोणी नसल्याने जीवित हानी टळली. या अपघातात टँकर चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना पत्रकारांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेथे घटना घडली तेथे आणखी काही लोक रस्त्याने जात होते, सुदैवाने ते बचावले. घटनेवेळी टँकरचालक नशेत असल्याचे सांगण्यात येते

Leave A Reply

Your email address will not be published.