पारोळा नगरपालिकेकडून ८० हजारचा दंड वसूल ; ७ हजारावर चाचण्या

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा नगर पालिके कडुन कोरोना ला अटकाव करण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

म्हणुन मागील २३ दिवसात ७ हजाराच्या वर कोरोना चाचण्या करण्यात आल्या असुन यात ३५० जण यात पाझिट्व्ह रुग्ण आढळुन आले आहेत तर सदर रुग्णाना पारोळा कुटीर रुग्णालयाशी संपर्क करून सदर रुग्णाना घरीच क्वरंटाईन राहाण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती पारोळा नगर पालिकेच्या मुख्यधिकारी श्रीमती ज्योती भगत यांनी दिली, तसेच पारोळा कुटीर रुग्णालयने अॅन्टीजन टेस्ट करण्यासाठी लागणारे साहित्य  वेळोवेळी पुरवुण तसेच मार्गदर्शन केले आहे, तसेच नगर पालिका मार्फत माझे कुंटुब माझी जवाबदारी,अंतर्गत नगर पालिका हद्दीतील सर्वेक्षण पुर्ण केले आहे.

सदर टेस्ट साठी न,पा, कर्मचारी संघमित्रा सदांशिव,कुणाल सौपुरे,अशोक लोहार,अभिजित मुंदाणकर,निर्भय मोरे,आकाश कंडारे,अक्षय चव्हाण,नरेंद्र पाटील,किरण कंडारे, आदी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले,तसेच पारोळा नगर परिषद पारोळा पोलिस प्रशासन,महसुल यांनी संयुक्त कारवाई करत अत्यावश्यक दुकाना शिवाय उघडी असलेल्या दुकानावर तसेच विनाकारण फिरर्णाया वर कारवाई करत ८०,८००रुपयाचा दंड वसुल करत तेरा दुकानाना सिल केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

या पथकात पथक प्रमुख संदिप सांळुखे,टि,डी,नरवाळे,अभिषेक काकडे,राहुल साळवे,पंकज महाजन,तलवारे,रमेश तिळकर, सचिन चौधरी,यांच्या सह पोलिस प्रशासना चे सुनिल सांळुखे,बापु पाटील,होमगार्ड हिरामण भोई,प्रभाकर पाटील,तसेच महसुल चे निशिकांत माने,गौरव लांजेवार,श्रीमती वर्षा काकुस्ते,एम,एस, वेरुळकर,या कर्मचार्यांनी आपले काम चोख बजावले असल्याची माहिती पारोळा नगर परिषदे मार्फत मुख्यधिकारी श्रीमती ज्योती भगत पाटील यांनी दिली,

Leave A Reply

Your email address will not be published.