आजचे पेट्रोल-डिझेल दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

0

मुंबई : आज सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. मागील दोन आठवड्यांपासून इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांकडून लवकरच ग्राहकांना झटका देण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक उरकताच कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७१ डॉलर प्रती बॅरलपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला होता. तब्बल १६ वेळा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.