बेवारस वृद्ध इसमास एकनिष्ठाने दिले जीवनदान

0

खामगांव(प्रतिनिधी) : जनसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा फाउंडेशनच्या सदस्यांनी बेवारस वृद्धास वेळेवर सामान्य रुग्णालयात नेऊन दिले जीवनदान सविस्तर माहिती अशी आहे की येथील नैशनल हायवे घाटपुरी रोड वर एक वृद्ध आजोबा तीन दिवसा पासून रस्त्यावर गंभीर स्थितीत पडलेले होते घटनेची माहिती काल दिनांक 29 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता एकनिष्ठा फाउंडेशनला मिळताच सुरजभैय्या यादव, पप्पू ठाकुर, खुशाल सेवक, संतोष कुटे, अभिषेक देशमुख, ऋतिक निंबाळकर, संदीप रामसे, आदित्य जवरे, गणेश बोदडे, अजिंक्य झाडे, जितु पांडे आदि सदस्यांनी लगेच ऑटो नेऊन सामान्य रुग्णालयात वार्ड नंबर १ मध्ये भरती करून दिले. डॉ. मोहसिन यांनी लगेच उपचार केले.

व तसेच बेवारस वृद्धास विचारपूस केली असता. त्यांचे नाव श्री. प्रकाश मिश्रीलाल कोठारी वय 68 राहणार एम आय डी सी मधील रहिवासी आहे असे सांगितले. आज दिनांक 30 एप्रिल रोजी रुग्ण प्रकाश कोठारी यांची प्रकृती चांगली आहे. एकनिष्ठा फाउंडेशनच्या सदस्यांनी रुग्ण प्रकाश कोठारी यांना वेळेवर रुग्णालयात आणले म्हणून त्यांना जीवनदान मिळाले अशी माहिती पप्पू ठाकुर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.