भाजयुमो अमळनेर तर्फे १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

0

अमळनेर (प्रतिनिधी):-  देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नाही, औषधे मिळत नाही इतकेच नाही तर ऑक्सिजनही मिळत नाही. सर्वत्र विदारक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच करोनाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. लसीकरणाआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहेत. राज्यात रक्ताचा साठा कमी आहे.

आपल्या रक्तदानाच्या दातृत्वाने गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते.यापैकी थॅलेसिमिया आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावं लागतं.

संकलित करण्यात आलेलं रक्त 35 दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, यामुळेच रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुरेसा साठा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्या रक्तदान करण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर तालुका व शहर तर्फे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, शहराध्यक्ष पंकज भोई,सरचिटणीस राहुल चौधरी,समाधान पाटील, भूषण देवरे,शुभम राजपूत,जगदीश पाटील यांनी रक्तदान करण्याचे कळकळीचे आव्हान रक्तदात्यांना केलेले आहे.दिनांक:-१/५/२०२१ रोजी ठिकाण:- रोटरी हॉल,डी आर कन्या शाळे समोर,सकाळी:-९:०० वाजता आयोजित केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.