निभोरा येथे विश्व हिंदु परिषद बजरंग दल शाखेच्या वतीने गावात सॅनिटाइझर फवारणी

0

भडगांव (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी निभोरा तालुका भडगांव येथे विश्व हिंदु परिषद बजरंग दल निभोंरा शाखेच्या वतीने ता.अध्यक्ष विनोद यादव पाटील व सदस्य यांनी हनुमान जयंती निर्मित्त संपूर्ण निभोंरा गावात दि.२९ एप्रिल रोजी ट्रक्टरच्या साह्याने पंपाव्दारे गावात सॅनिटाइझर फवारणी केली.

राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता निभोंरा ग्रामपंचायतीने निर्जंनतुकीकरणा कडे दुर्लक्ष केल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. मात्र हनुमान जयंती निमित्त बजरंग दल निभोरा शाखेच्या वतीने गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आल्याने गावातील रहिवाशांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी माधव शकंर पाटील-माजी सरपंच,विश्वास वामन पाटील माजी सरपंच, शरद पाटील-पोलिस पाटील, गोरख पाटील-ता.संघटक शिवसेना, श्रीकांत पाटील- निभोरा शाखा अध्यक्ष(बजरंग दल),गौतम मोरे, वाल्मीक पाटील,पुडंलिक कोळी, उपस्थित होते

तर गावात सॅनिटाइझर फवारणी करण्याकामी गोपी पाटील,प्रविण पाटील,संभाजी पाटील,उदय पाटील, ज्ञानेश्वर पाटील,मयुर पाटील,जितु पाटील, सागर पाटील,गोपाल पाटील,पवन पाटील. या सदस्यायांनी परिश्रम घेतले. या वेळी येथील ग्रामस्थ जनतेने सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.