जिल्ह्यात आज नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक

0

जळगाव  प्रातिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात ११०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आज १ हजार ०६३ नवे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मृताचा आकडा मात्र वाढताच आहे. आज पुन्हा २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ९९७ वर पोचली. तर ११०३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ८ हजार १२९ झाला आहे. २१ जणांच्या मृत्युने बळींची संख्या २१६३ वर पोचली आहे. अद्यापही मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात १६७, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, भडगाव ९, पाचोरा ४७, धरणगाव २०, यावल २८, एरंडोल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर ०२, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ७ असे एकूण १०६३ रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.