जामनेरात स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल बेटिंगवर धाड

0

जामनेर प्रतिनिधी : शहरातील पाचोरा रोडवरील श्रीराम नगर भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरात सुरू असलेल्या आय पी एल बेटिंग वर दिनांक 28 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्यात  पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, येथील श्रीराम नगर भागात आय. पी. एल. वर सट्टा खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागली होती.

त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून कारवाई केल्याचे बोलले जात आहे.ह्या कारवाईत ८ मोटार सायकली सह ६३,६३० रोख रक्कम व वेगवेगळ्या कंपनीचे २७ मोबाईल, टीव्ही संच आदी वस्तूनसह ५,३०,७३० रुपयांचा मुद्देमाल मालं हस्तगत करण्यात आला असून  अशोक उखर्डू हिवराळे, अक्षय प्रताप पाटील, विकास सुरेश माळी, अजय विठ्ठल माळी, शुभम संजय पाटील, संदीप देविदास खडके, सतीश लक्ष्मण माळी, जहीर खान हनीफ खान, भूषण सुरेश कवळकर, किरण अनिल जाधव , धनराज प्रल्हाद साबळे, उमेश दिलीप जगताप सर्व राहणार जामनेर ,अमन सुधाकर दळे राहणार टाकळी,सचिन हिलाल धनगर राहणार शिंगाईत अशा १४ आरोपींविरोधात गुन्हे शाखेचे सहय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील किशोर नाईक यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये गुर.न.१३९/२००२१ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५,१२ अ, सह भा द वी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.