राज्यात 15 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावा, उच्च न्यायालयाची राज्याला सूचना

0

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज ६० ते ७० हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच नागरिकांचे कोरोनाविषयक गांभीर्य लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. तसेच कोरोनाविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीयेत. कोरोनाविषयक नियमांचं पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसं रोखलं जाणार असा सवालसुद्धा हायकोर्टाने केलाय.

मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले ?

राज्यातील कोरोना आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यातली परिस्थिती पाहिली तर अजूनही लोक बाहेर दिसत आहेत. लोक अजूनही गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. राज्य सरकारने पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करावा, अशी सूचना न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.