भडगाव तालुक्यातील आग लागून घर उध्वस्त झालेल्या सात कुटुंबांना महिन्याभराचा किराणासह मदत

0

भडगाव (सागर महाजन) : भडगाव तालुक्यातील धोत्रे, कजगाव, आमदडे, गुढे, महिंदले, कोळगाव, वरखेड या गावांमध्ये गेल्या महिनाभरात शॉकसर्किट मुळे घर, दुकान, गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली होती.आगीमुळे घरातील संसार उपयोगी साऱ्या वस्तू जळून खाक झाल्यामुळे या सात कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. या बाबत भडगाव तहसिलदार- सागर ढवळे, तलाठी संघटना भडगाव, महसूल कर्मचारी संघटना यांनी संयुक्त विद्यमाने  या सात कुटुंबीयांना महिनाभराचा किराणा स्वखर्चातून दिल्याने कुटुंबीयांना अशीही सह्र्दयी मदत करून त्यांची चूल पेटवली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील धोत्रे -सुनील युवराज पाटील यांचे घर, कजगाव – रघुनाथ परशराम पवार यांचे दुकान, आमडदे -अंकुश शंकर बोरसे यांचे घर, गुढं – गोपाळ राजेंद्र पाटील यांचा गोठा, महिंदळे येथील घर, कोळगाव शोभाबाई राजेंद्र थोरात यांचे घर, वरखेड बेबाबाई पंडित वाघ यांचे घर, असे तालुक्यातील सात कुटुंबीयांचे घर, दुकान गोठा, आगीत जळून यातील साऱ्या उपयोगी वस्तू खाक झाल्या. या मुळे यांचे लाखोंचे नुकसान झाले. यावेळी प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा केला. या सात कुटुंबियांवर रोजचा जेवणाचा प्रन्न, उपासमारीची वेळ आली होती. तसेच सध्या लॉक डाऊन असल्याने सारीकडे कामे बंद असल्याने अधिक चिंता जनक बाब झाली होती.

या अश्या परिस्थितीत भडगाव तहसिलदार- सागर ढवळे, टोंनगाव तलाठी- राहुल पवार, नायब तहसिलदार- रमेश देवकर, कजगाव तलाठी- उमेश पाटील, आमडदे मंडळअधिकारी- सुरेश पाटील, लिपिक- महादेव कोळी, कजगाव कोतवाल – नितीन मोरे, आदींनी सदर घटना स्थळी जाऊन पाहणी केली तसेच एक महिना पुरेल एवढे अन्न धान्य, किराणा वाटप करून या कुटुंबीयांना धीर दिला. या किराणा व अन्न धान्य मध्ये तांदूळ, गहू.,तेल, शेंगदाणे, यासह दैंनदिन वापरचे वस्तू हे देण्यात आले. तसेच या व्यक्तींचा प्रस्ताव सानुग्रह अनुदानासाठी पाठवण्यात येणार असून त्यांना या रकमेचा धनादेश देण्यात येणार आहे. असे तलाठी राहुल पवार यांनी सांगितले. या आगीत नुकसान झालेल्या सात कुटुंबांना तहसील कडून मदतीचा हात मिळाल्याने मोठा आधार मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.