महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन जिल्हा सचीव रोहित काळे यांनी दिले आ.चंद्रकांत पाटलांना निवेदन

0

मुक्ताईनगर :-(प्रतिनिधी) विषय- राज्य सरकारने गट ब (अराजपत्रित) आणि क सरळसेवा संवर्गाची पदभरती प्रक्रिया खासगी आयटी कंपन्यांकडून राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यास रद्द करण्याबाबत आणि त्याच परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या अशी मागणी (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन)चे जिल्हा सचिव व प्रतिनिधी भारत (संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक) रोहित पंढरीनाथ काळे यांनी आमदार चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना 27/एप्रिल/2021 )ला केली.

महाराष्ट्रातील सर्व परीक्षार्थीकडून राज्य सरकारने घेतलेल्या गट ब (अराजपत्रित) आणि क सरळसेवा संवर्गाची पदभरती प्रक्रिया खासगी आयटी कंपन्यांकडून राबविण्याच्या निर्णयाचा सर्वच स्तरावर विरोध होत आहे. त्यासाठी पाच खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र गेल्या काही पदभरती परीक्षांमधील गोंधळ पाहता या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थीकडून तीव्र विरोध होत असून सर्वच पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबविण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने गट ब (अराजपत्रित) आणि गट क पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी पाच कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक निवड समित्या आणि राज्यस्तरीय निवड समितीने संबंधित कंपनीच्या आधारे पदभरती प्रक्रिया राबवनार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरळसेवा सरकारी पदभरती प्रक्रिया ही खासगी कंपन्यांमार्फत राबविण्यात येणार असून राज्यातील सर्व परीक्षार्थी या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत, आणि परीक्षार्थीकडून मागणी ही होत आहे की जर आयोग सक्षम असेल तर ह्या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या, कारन आयोगाने शासना सोबत पत्र व्यवहार सुद्धा केला की पुरेसा मनुष्यबळ आहे परीक्षा घेयायला ,तरी शासनाकडून यावर दुर्लक्ष करण्यात आले.

विद्यार्थ्यांची मागणी ही देखील आहे की शासनाने या बाबत दखल घेऊन खासगी कंपन्यां पेक्षा पारदर्शकता जर आणायची असेल तर आयोगानेच परीक्षा घ्याव्यात . तरी ही विनंती (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन)चे जिल्हा सचिव व प्रतिनिधी भारत (संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक) रोहित पंढरीनाथ काळे यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या कळे केली.

लवकर निर्णय होईल आणि या संदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार साहेबांनी सांगितले .आणि आमदार साहेबांनी या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना देखील पत्र दिले असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.