तुटपुंजा साठ्यामुळे लसीकरणाचा झाला खेळखंडोबा

0

अमरावती (प्रतिनिधी) : राज्य शासनाकडून अमरावती जिल्ह्याला अत्यंत मर्यादित स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक लसिंचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र दिसत असून. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोणा लसिंचि मागणी वाढली आहे. मात्र मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच हेळसांड होत आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने साडेचार लाख कोरोना लसीचि  मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र त्यापैकी केवळ 25000 लसींचाच पुरवठा अमरावती जिल्ह्याला करण्यात आला.त्यामुळे लसीचा मिळालेला मर्यादित साठा आणि लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या यांचा ताळमेळ बसविणे म्हणजे . प्रत्येक लसीकरण केंद्रावरील अधिकार्यां करिता तारेवरची कसरत झाली आहे. कोरोना ची लस मिळेल या भावनेतून नागरिक सकाळपासूनच लसीकरण केंद्रासमोर रांगा लावून बसत असताना . नागरिकांना केंद्रावर मर्यादित साठा असल्याचे सांगून परतुन लावण्यात येत आहे. अमरावती शहरातील लहान मोठ्या लसी केंद्रावर हीच अवस्था असून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राची तर अवस्था त्यापेक्षाही बिकट दिसते आहे.

भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीचा साठा संपला असल्याने .शहरातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज मिळणे कठीण झाले आहे . अनेकांचा लसीचा विहित कालावधी पूर्ण झाला असल्याने . महापालिका क्षेत्रातील नागरिकांना  कोव्हॅक्सिन लसिचा केवळ दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात येत आहे.पहिला डोस घेण्याकरिता केंद्रावर जाणाऱ्यांना लगतच्या दुसऱ्या केंद्रावर जाण्याचा सल्ला केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्याला सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक च्या या दोन कंपन्यांच्या लसीचा मर्यादित साठा काही दिवसांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र तोही साठा संपल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण थांबविण्यात आले आहे. नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लस केव्हा उपलब्ध होणार अशी विचारणा करीत  आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.