राजमालतीनगरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

0

जळगाव  प्रतिनिधी | राजमालतीनगरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घटना घडली.

जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरातील राजमालतीनगर येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासोबत राहते. २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास या मुलीस अज्ञात व्यक्तीने कुणीतरी पळवुन नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटंुबींयानी परिसर, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु, मुलगी मिळून आली नाही. याबाबत मुलीच्या आईवडिलांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.