मन हेलावून टाकणारी घटना, आई-वडिलांच्या छळाने जळगावात बालिकेचा मृत्यू

0

जळगाव : अल्पवयीन मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी केलेल्या छळाने तिचा जीव घेतला. जळगाव शहरात पिंपळा शिवारामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिचे आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न-पाणी दिले नाही, तिला आंघोळ न करु दिल्याने तिला शारीरिक व्याधीही जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.   मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत थेट आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीचे हाल हाल करून तिला मरणाच्या दारात सोडल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.  शेख दांपत्याने कोणास काही एक न सांगता दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा दफनवीधी उरकून दोघे बेपत्ता झाला होते. याप्रकरणी  पोलिसांनी निर्दयी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी पिता व्यवसायाने केमिस्ट आहे. त्याचा एक भाऊ डॉक्टर तर दुसरा वकील आहे. मुलीचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी त्याच्या मेडिकल दुकानाला आग लागली. या दोन्ही घटनांमुळे बालिका ही अपशकुनी असल्याचा समज त्याने करुन घेतला होता.

तेव्हापासून तिला डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता. तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अंमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.

बालिकेच्या मृत्यूनंतर परस्पर दफनविधी

मृत्यूनंतर मुलीचा परस्पर दफनविधी करण्यात आला होता. या घटनेनंतर तिच्या मामाने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिस तपासात हे सारे प्रकरण समोर आले आहे.

अंघोळदेखील करु न दिल्याने डाेक्यात उवा

शेख दांपत्याने कनीज हिला अनेक दिवसांपासून अंघोळदेखील करू दिली नव्हती. त्यामुळे तिच्या डोक्यात उवा पडल्या होत्या. मृत्यूनंतर तिची अंघोळ करताना डोक्यातून उवा व चिकट द्रव बाहेर पडत होते. मृत्यूपूर्वी ती रांगत असल्यामुळे गुडघ्यावरील कातडी निघालेली होती. तसेच कनीज अत्यंत कमजोर झाली होती, असे मृत्यूनंतर तिची अंघोळ घालणाऱ्या परवीनबी शेख रफिक यांनी पोलिसांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.