मुक्ताईनगरमध्ये हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त

0

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) : शहरातील भिल्लवाडीमध्ये भर रहिवाशी भागात अवैधरित्या सर्रासपणे सुरू असलेल्या गावठी  दारुची निर्मिती करणाऱ्या हातभट्टी ठिकाणावर गुप्त माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांनी धाड टाकत 59,400 रु चा मुद्देमालासह रसायन व हातभट्टी अड्डा वतसेच गावठी दारू नष्ट केल्याची व राजेश बोदडे यास ताब्यात घेतल्याची घटना दि.२८ एप्रिल रोजी दु.३ वाजेच्या सुमारास घडली.नवीन पोलीस निरीक्षकांनी रुजू होताच अवैध धंदे चालकांना धाडसी कारवाई करून अवैध धंदे चालकांना इशाराच दिला असल्याचे बोलले जात आहे.

यांनी केली कारवाई –

मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लांवड यांच्या मार्गदर्शनाखाली कालच पदभार स्वीकारलेल्या नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार ,पोलिस उपनिरिक्षक निलेश सोळुंके, हवालदार गणेश मनोरे, गणेश चौधरी, संतोष नागरे ,देवसिंग तायडे मंगल साळुंखे, नितिन चौधरी, संभाजी बिजागरे ,कांतीलाल केदारे , गोपीचंद सोनवणे, होमगार्ड देवेंद्र काटे, भुषण खडसे, निलेश घुले, अनिल शिंदे, सुशिला पाटील, सुनंदा भोई, वंदना जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली .

दुसऱ्या कारवाईत एक डोळा लावून कारवाई  : 

राष्ट्रीय महामार्गावरील अनेक धाबे व हॉटेलीत सोशल डिस्टनसिंग चा फज्जा दररोज रात्री उडून लाखो रु मद्य विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे. याला खाकीसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचा  आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते .परंतु हायवे वरील केवळ एकाच हॉटेल वर 4000 रु च्या मुद्देमालासह विदेशी दारू विना परवानगी अवैधरित्या विक्री होत असल्याच्या कारणावरून राजेश राजपूत यांच्यावर  कारवाई करण्यात आलेली आहे. सर्वत्र नवीन दमाच्या पोलीस निरीक्षकांकडून मुक्ताईनगर तालुका अवैध धंदे माफिया राज पासून मुक्ती होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.परंतु कारवाईत देखील एकाच डोळ्याने कारवाई झाल्याचे बोलले जात असून  राजाश्रयाने चालणाऱ्या माफियांना का सोडण्यात आले असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

खत्री गल्ली वर अंकुश असणे गरजेचे : 

शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात दिवसा ढवळ्या सट्टा, ऑनलाईन सट्टा व चक्री  व्हिडीओ गेम लॉकडाऊन संचार बंदी नियमांच्या  ….घो करीत सर्रासपणे सुरू असून कोरोना कसा जाणार या मथळ्याखाली दै दिव्य मराठी ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे अर्थपूर्ण आशीर्वाद असल्यावरही नाईलाजाने कारवाई करावी लागली होती .विशेष म्हणजे बिट हवालदार या कारवाईत हिरो (आधी आरडा ओरड करून सटोडीना पालविण्यासाठी) होण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते . हे कारवाई करणारे पोलीस पथक जाणो की नेहमी चे संबंध असलेले सटोडी जाणो.पण सद्या पाच ते सहा दिवसांपासून खत्री गल्ली सामसूम आहे. ही नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या कारकीर्दीत अशीच सामसूम  राहणार की पुन्हा या गल्लीला तेजी येणार हे येत्या काळात दिसूनच येईल .

Leave A Reply

Your email address will not be published.