रेमडिसिव्हीयर इंजेक्शनच्या तुटवड्याला प्रशासकीय व अति राजकिय हस्तक्षेपच कारणीभूत

0

चिखली (प्रशांत ढोरे पाटील) : कोरोना रुगणांनाची सर्वत्र  होणारी वाढ व त्यातच रेमडिसिव्हीयर इंजेक्शनचा होणारा तुटवडा याला सर्वस्वी राजकीय मंडळींचा व प्रशासनाचा अति हस्तक्षेप  कारणीभूत ठरत आहे,लाखो रुपये ऍडव्हान्स पाठवून येणाऱ्या इंजेक्शन वर प्रशासकीय अधिकारी आपत्कालीन कायद्याचा धाक दाखवून त्यांनी त्यांच्या रुघ्नांसाठी बोलावलेला साठा देखील मेडीकलला ठेऊ देत नसल्याने कित्येक मेडीकल धारक इंजेक्शन बोलवणेच बंद करण्याचा विचार करत आहेत व काहींनी बोलावणे ही बंद केले आहे,सर्वत्र जिकडे बघाल तिकडे गल्लीबोळात दगडा खाली नेते तयार झालेले असतांना ज्याला साधं धड रेमडिसिव्हीयर म्हणता येत नाही तो देखील अन्न व औषध प्रशासन आधिकारी,डॉक्टर व मेडीकलधारकांना धारेवर धरून नाहक त्रास देत आहे. विनाकारण एका पेन्शनट भवती दहा दहा नातेवाईक हॉस्पिटल व मेडिकल भवती इंजेक्शनच्या मागणीसाठी गर्दी करत आहेत व  बरेच हौसे नौसे  नेते तर रुघ्न सेवेच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहेत,बघता बघता तर या रेमडिसिव्हीयर इंजेक्शनची कोरोनावर मात करता करता अति तुटवड्याने व राजकीय मंडळींच्या अति हस्तक्षेपामुळे तर रेमडेसेवीर इंजेक्शन राजकीय प्रचाराचे साधनच बनले की काय असे दिसत आहे.

या राजकारण्यांना तर या निमित्ताने एक नामी संधी चालून आल्याचे दिसत आहे याआधी कुणी कल्पनादेखील केली नसेल की संकटग्रस्त हतबल मतदाराला त्याच्या संपुर्ण परिवाराला, नातेवाईकांना  कायमचे गुलाम करण्यासाठी, वोटबँक तयार करण्यासाठी, वोटबँक सिक्युर करण्यासाठी या इंजेक्शनचा अस्त्र म्हणून असादेखील उपयोग होईल!! रुग्णाला इंजेक्शनची गरज भासली की नातेवाईकांना राजकीय नेते व लोकप्रतिनिधींची, त्यांच्या चमचांची, राजकीय दलालांची विनवणी करावी लागेल, “साहेब, आम्ही आपले कामय ऋणी राहू परंतु इंजेक्शन मिळवून द्या” असे आर्जव करावे लागेल !

साधी बाब आहे, ते इंजेक्शन आहे आणि ते सहजासहजी मेडीकल स्टोअर व दवाखान्यात उपलब्ध असायला हवे! ते तिथे न मिळता पक्ष कार्यालयात, राजकारण्यांकडे आणि साठेबाजांकडे मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. जीवनरक्षक औषधे जर काळ्याबाजारात, साठेबाजीत आणि राजकारणात अडकत असतील तर विचार करा! परिस्थिती किती भयानक आहे.

जे इंजेक्शन कायम 2℃ ते 8℃ तापमानात ठेवावे लागते व जे नाही ठेवले तर सकारात्मक परिणाम तर सोडा त्याचे नकारात्मक परिणाम दिसतात, ते इंजेक्शन सुरक्षितरित्या ड्रग्ज स्टोअर व दवाखान्यात न मिळता भलतीकडेच मिळतेय!!

साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करायची आणि भयभीत संकटग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना ते चढ्या दराने विकायचे किंवा उपल्ब्ध करून देऊन कायमचे उपक्रुत करून आपले अंकीत करायचे ही कसली मानवता? हे तर राजकीय पोळी भाजणे झाले!! लोकांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवायचे, आपण किती मदतगार व संवेदनशील आहोत हे खोटे खोटे दाखवून द्यायचे व अंततः अंतर्गत आपले इप्सित साध्य करायचे! परंतु ते आपल्या लक्षात येत नाही. येणार तरी कसे? अडला हरि गाढवाचे पाय धरी!!! साधी बाब आहे, गरजच का पडावी कुणाकडे इंजेक्शनच्या, ऑक्सिजन बेडच्या मदतीची भिक मागण्याची???

वैद्यकीय गरजा जर राजकाण्यांच्या दरबारात पुर्ण होत असतील तर कायदा व सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असेच म्हणावे लागेल ना??? तरी सर्व राजकारण्यांना कळकळीची विन्नती आपण या कोरोना काळात मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुघ्नांच्या टाळूवरील राजकीय स्वार्थापोटी लोणी खाण्याचा प्रयत्न थांबवा व उगाच चोप देईल अस करेल तस करेल अश्या स्टंटबाज्या व प्रक्षोभक वक्तव्य थांबवावे व  त्यांनी फक्त किमान  एखाद्या तरी रुगणांला एखादं  इंजेक्शन किंवा बेड  उपलब्ध करून दयाव उगीच जे या काळात दिवसाची रात्र करून आपलं आरोग्य धोक्यात घालून कर्तव्याने का होईना रुघ्नसेवा करत आहेत त्यांचं मनोबल जरी आपल्याला वाढवता येते नसेल तरी चालेल परंतु त्यांचं खच्चीकरण तरी करू नका असे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे  व डॉक्टरांनी देखील आपल्या क्षमतेनुसारच रुघ्नांना भरती करून घ्या उगाच पैश्याच्या हव्यासापोटी रुगणांच्या जीवाशी खेळू नका असे मत रयत क्रांती संघटना व बुलढाणा केमिस्ट संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.