श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सवा निमित्त एकनिष्ठाचा उपक्रम

0

खामगांव(प्रतिनिधी) : रुग्णसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा फाउंडेशनचा उपक्रम भगवान श्रीराम नवमी व तसेच श्री हनुमान जन्मोत्सवचे औचित्य साधून या महिन्यात वृक्षारोपण व रक्तदान शिविर प्रभु श्रीराम व भक्त हनुमान यांचे दर्शन घेऊन राबविन्यात आले. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे 71 रक्तनायकांनी रक्तदान करून रुग्णाचे जीव वाचविले.

एकनिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी आवाहन केल्या नुसार लॉकडाऊन कोरोना काळात संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने शिवम मानकर, संजय मात्रे, शेखर रिछारीया, अनिल चव्हाण आदि लोकांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण व रक्तदान शिविर घेऊन खामगांव येथील शासकीय रक्तपेढी मध्ये रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल वैद्यकीय निवासी डॉ निलेश टापरे यांनी रक्तनायकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या उपक्रमात विशाल धांडे, अशोक पटोले, राम अवचार, जितेंद्र मच्छरे, डॉ. निशांत मुखिया, गजानन मच्छरे, गोविंदा पटोले, मयूर वानखडे, अशोक भिसे, राम पवार, शुभम पाटील, मोहित जामोदे, विष्णु हटकर, चेतन अहिर, भुषण श्रीकांडे, विकास गिरी, संतोष चव्हाण, संतोष कुटे, संदीप तळोले, आकाश सुरजोसे, प्रमोद नथले, प्रवीण बराटे, नितिन सातव, कृष्णा चव्हाण, आदर्श साकला, अजिंक्य झाडे, श्रेयश पाटील, अमित अमृतकर, जीवनगिर मुळे, अजय पवार, कैलास चव्हाण, गणेश बानाईत, प्रकाश बावस्कार, प्रशांत मावळे, दिनेश मुळे, आकाश मिरचंदानी, शरद पाटील, राजु जुनगडे, रमेश खैरे, सचिन भंसाली यांच्यासह बहुसंख्य रक्तनायकांनी रक्तदान करून रुग्णाला दिले जीवनदान अशी माहिती शिवम मानकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.