रस्त्यावर दुचाकी स्लीप झाल्याने पासर्डी येथील 65 वर्षीय वृद्ध ठार

0

भडगाव (प्रतिनिधी) : चोपडा येथे भाचीला सोडुन घरी परत येत असताना रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने पासर्डी येथील 65 वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना दि.26 रोजी घडली असून या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पासर्डी येथील निंबा हसरथ पाटील हे भाचीला सोडण्यासाठी चोपडा येथे गेले होते. भाचीला सोडल्यानंतर घरी परतत असताना नगरदेवला स्टेशन येथील अविनाश हॉटेल जवळ त्यांची बजाज प्लाटिना क्र. एम एच.19 सी. टी.1354 ही दुचाकी अचानक स्लिप झाल्याने निंबा हसरथ पाटील वय (65) यांना गंभीर मार लागला या वेळी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला फिर्यादी- प्रविण निंबा पाटील रा. पासर्डी यांच्या फिर्यादीवरून भाग – 5 गु.र.न.88/ 21 कलम 304(अ),279,337,38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. कैलास गीते हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.