जळगावात ११ वर्षाच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको भागातील ११ वर्षाच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. मुलीच्या पालकांनी कुणालाही माहिती न देता तिच्या पार्थिवाचे दफन केल्याने मृतदेह काढून तपासणी करण्यात येत आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको येथे ११ वर्षाची मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला होती. या मुलीचा २३ एप्रिल रोजी आकस्मीक मृत्यू झाला. तिच्या पालकांनी कुणालाही माहिती न देता तिच्या पार्थिवाचे दफन केले.

दरम्यान, आपल्या नातीचे अचानक मृत्यू झाल्याची माहिती तिचे आजोबा (आईचे वडील) व मामा यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या आई व वडिलांची चौकशी केली असता त्यांना विसंगती आढळून आली. यामुळे आता त्या मुलीचा मृतदेह उकरून काढून तिच्या शरीरावर घातपाताच्या काही खुणा आहेत का ? याची तपासणी करण्यात येणार आहे.

आज दुपारी या संदर्भात रामानंदनगर पोलीस स्थानकात मुलीचे आई-वडील व इतर दोन जणांची कसून चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.