रेमडीशिविर वापराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0

अमरावती (प्रतिनिधी) : खाजगी रुग्णालयांमध्ये रेमडीशिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होऊ नये यासाठी समन्वय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, उपलब्धता व नियंत्रणासाठी सर्वकष प्रयत्न होत आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

540 व्हायल आणखी उपलब्ध 

जिल्ह्यात गरजूंना रेमडेसिविर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. रेमडेशिविर चा अनावश्यक वापर टाळण्यासाठी व काळाबाजार होऊ नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. भिलाई येथून ऑक्सीजन टँकरद्वारे पुरवठा होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बळवंत गोतमारे यांनी सांगितले.

रेमडेसिविर च्या दीड हजार व्हायल शासकीय औषधी भांडार कडे उपलब्ध असून ,त्याशिवाय 540 आणखा उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले . गरजू रुग्णांनाच इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे .अनावश्यक वापरावर निर्बंध आहेत .

कोविड रुग्णालयातील खाटांची स्थिती उपलब्ध साधनसामग्री याबाबत माहिती कळवण्यासाठी कोविड सुविधा हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे .ते वेळोवेळी अद्ययावत करून माहिती प्रसारित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.