पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन केला वाढदिवस साजरा

0

मलकापूर:- शहरातील कृष्णा फोटो स्टुडिओचे संचालक योगेश शर्मा यांचे सुपुत्र ऋषी याचा  दि. 25 एप्रिल रोजी सतरावा वाढदिवस कुठलाही गाजावाजा न करता,ढोलताशे न पिटता,भला मोठा केक न कापता, चिं. ऋषी याने शहरातील बोदवड रोड,घिर्णी रोड, बुलढाणा रोड, नांदुरा रोड, मुक्ताईनगर रोड वरील झाडांवर पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी  घरगुती बनविलेले चंबु लटकवुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने भर उन्हाळ्यात पक्षांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न केला त्याच्या या कामगिरीचे आई-वडील,आजी आजोबा सह नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष विरसिंह दादा राजपुत यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.