लातूर-बिड जिल्हा बाॅर्ङरवर सक्तीची तपासणी ; पोलिसांच्यावतीने वाहनांची कसून तपासणी

0

किनगांव प्रतिनिधी : अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस हद्दीत पोलिसांनी लातूर बिड जिल्हा हद्द बॉर्डरवर वाहनाची सक्तीची तपासणी करून मास्क न वापरता विनाकारण फिरणाऱ्याची कङक चौकशी करून घरी राहण्याचे अव्हान करण्यात येत आहे.

कोरोना महामारी रोगा विषयी हलगर्जीपणा करणाऱ्यांना चोप देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.किनगांवातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर पोलीस कर्मचारी तैनात आहेत.सर्व वाहने तपासणी करून सोडण्यात येत असल्याची माहिती किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.शैलेश बंकवाङ यांनी दै.युवा छञपतीशी बोलताना सांगितले.लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये मास्क वापरून सॅनिटराईज चा वापर करावा.

अत्यावश्यक कामा शिवाय कोणी बाहेर येउ नये असे आवाहन करण्यात आले.जिल्हा बाॅर्ङर वर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शरद कांदे,महेबूब सय्यद,मनिष गोरे,गणेश हाके,मन्नान शेख,आदीजन कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.