महाराजा मसाला उद्योगतर्फे रूग्ण व नातेवाईकांसाठी सकाळ-संध्याकाळ भोजन

0

खामगाव (प्रतिनिधी) : सध्या कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रूग्ण शहरातील सरकारी व खासगी रूग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

दरम्यान कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची स्थिती असल्याने शहरातील सर्व हॉटेल व भोजनालय बंद असल्यामुळे शहराबाहेरील रूग्ण व नातेवाईकांची भोजनाची असुविधा दुर करण्यासाठी स्थानिक महाराजा मसाला उद्योगच्या वतीने मोफत भोजन व्यवस्था आज 26 एप्रिल पासुन सुरू करण्यात आली आहे.

गरजुंनी दुपारच्या जेवणासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळच्या जेवणासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7276255257  या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर मॅसेज करावा. त्यांना रूग्णालयात डबा पोहचविण्यात येईल. या सुविधेचा रूग्ण व नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.