खामगावात शाळेसमोरील रस्ता बनला डम्पिंग ग्राऊंड!

0

खामगाव (गणेश भेरडे) : येथील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 3 समोरील रस्त्यावर साचलेला कचरा पाहता सदर रस्ता डम्पिंग ग्राऊंड झाला असल्याची तक्रार स्थानिक नागरिक मुन्ना सुर्यवंशी यांनी केली असून प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्यावर कचराच कचराच साचला असल्याचे दिसून आले. कचर्‍याचे ढिगार अस्ताव्यस्त करण्यात वराह सक्रीय झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, पण लक्ष देणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वच्छतेचा दिंडोरा पिटणार्‍या नगर पालिकेने राज्य व विभागीय स्तरावर पुरस्कार सुध्दा प्राप्त केलेला आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. स्वच्छतेच्या नावावर शहरातील कचरा उचलण्यासाठी करोडोचा ठेका देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय शहरातील प्रभागामध्ये घरोघरी जावून कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या सुध्दा शहरात दररोज सकाळ-संध्याकाळ फिरत आहेत. मात्र उपरोक्त परिस्थिती पाहून न.प.च्या आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहे.

शाळेसमोरील सदर रस्ता लाखो रूपये खर्चुन तयार करण्यात आला आहे. तो कुचकामी ठरत असल्याने त्याचा डम्पिंग ग्राऊंड सारखा उपयोग केला जात असल्याचे उपहासाने बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.