नवविवाहितेस आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी पती, सासु-सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मलकापूर:- मोटारसायकल घेण्यासाठी माहेरवरुन पन्नास हजार रूपये आणण्याचा तगादा लावीत शारीरिक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस परावृत्त केल्याची फिर्याद मृतक सुजाता ची आई नामे संगीता सागर वाघ रा. बहापुरा ता.मलकापुर यांनी ग्रा.पोस्टे ला दिल्यावरून ग्रा.पो.नी पती,सासु,सासरा,नणंद, भावजय सह नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पो.स्टे हद्दीतील ग्राम हिंगणाकाझी येथील एकविस वर्षीय नवविवाहिता सौ.सुजाता अरविंद सोनवणे  ही दि. 20 एप्रिल 21 रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास घराबाहेर जाताना दिसली वरून तिच्या पतीने तिला आवाज दिला असता ती अंधारात कुणाला काहीही न सांगता निघून गेली म्हणून पती व इतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. अशा फिर्यादीवरून ग्रा. पो.नी  मिसिंग नंबर 5/21 प्रमाणे नोंद केली होती.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनील बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो. काॅ रविकांत बावस्कर करीत असताना काल दि.23 रोजी हिंगणाकाझी शिवारातील पंकज जंगले यांच्या शेतातील विहिरीत सौ सुजाता अरविंद सोनवणे मृतावस्थेत आढळून आली, पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुजाताचा मृतदेह  विहिरीतून बाहेर काढून मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात  येथे शवविच्छेदनासाठी दाखल केला तर याप्रकरणी मृतक सुजाता ची आई संगीता सागर वाघ रा. बहापुरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासु, सासरे, देर,जेठ,जेठाणी ,नणंद हे सुजाताचा मानसिक व शारीरिक छळ करीत असून माहेरून मोटारसायकल आणण्यासाठी 50 हजार रुपये तगादा लावत असल्याने व पैसे आणले नाही म्हणुन त्रास देत होते अशा फिर्यादीवरून पती अरविंद शांताराम सोनवणे,सासरा शांताराम सोनवणे, प्रवीण सोनवणे, गणेश सोनवणे,भागवत गायकवाड, प्रज्ञा गायकवाड, यमुना शिरसाट शिरसाट,बेबाबाई शिरसाट अशा एकूण नऊ जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कलम 306, 498,504,34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि .अनिल बेहराणी यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.नामदेव तायडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.