कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्तधान्य ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याची परवानगी द्यावी

0

धर्माबाद (प्रतिनिधी)- धर्माबाद तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत चालली असून, ही शृंखला तोडण्यासाठी स्वस्त धान्याचे ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी रास्त मागणी स्वस्त दुकानदार संघटनेचे धर्माबाबत तालुका अध्यक्ष बाबू गोरजे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

धर्माबाद तालुक्यात एकूण 57 स्वस्त धान्य दुकाने असून वीस हजाराच्या वर लाभार्थी आहेत. त्यांना एईपोस मशीन द्वारे अंगुठा घेऊन म्हणजेच फिंगर प्रिंट घेऊन धान्य वाटप करणे हे अतिशय धोकादायक काम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनले आहे. नुकतेच लोहा तालुक्यात 36 स्वस्त धान्य दुकानदारांना यामुळे कोरोनाची लागण होऊन तिघे स्वस्त धान्य दुकानदारांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोणाची शृंखला तुटून रुग्णसंख्या कमी होण्यापर्यंत का होईना स्वस्त धान्याचे ऑफलाइन पद्धतीने वाटप करणे हिताचे ठरेल. पण असा आदेश जिल्हाधिकारी व आयुक्तही काढू शकत नाहीत.

त्यांना असे अधिकार स्वस्त धान्य वितरण प्रणालीच्या संबंधात ठेवले गेले नाही. ते थेट मंत्रालयाशी संबंधित असून त्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्रव्यापी संघटनेने अशाच पद्धतीचे निवेदन दिले असून त्या धर्तीवर धर्माबाद स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबू गोरजेनेंही रास्त मागणी ए काल निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.