फैजपूर परिसरात कडक निर्बंध लागू असताना काही वाईन शॉप व बिअर बारकडून सर्रास दारु विक्री

0

फैजपूर प्रतिनिधी: देशभरात कोरोनाचा हाहाकार माजला असुन शासनाने वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.यामधे दारुचे दुकानं( वाईन शॉप),बार यांच्यावर देखील कडक निर्बंध घातले आहेत.पण फैजपूर परिसरात या नियमांचे काही दारु विक्रेत्यांकडून (वाईन शॉप कडून) बिअर बार कडुन सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमधे परवानाधारक दारु विक्री दुकाने(वाईन शॉप) व बार यांना लागु केलेल्या नियमांमध्ये दुकानावर दारू न विकता घरपोच सेवा देण्याचे सांगण्यात आले असून फक्त दारू पिण्याचा परवाना असलेल्या मद्यपींनाच घरपोच दारु दिली जावी असा नियम लागू करण्यात आला आहे.परंतु फैजपूर परिसरातील काही दारु विक्रेते आपल्या दुकानाचे शटर अर्धे वर करून व नियम पायदळी तुडवून अव्वाच्या सव्वा दराने दारु विक्री करतांना दिसत आहेत.यामुळे कोरोनाची लागण अजून मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दारु खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक तसेच विक्रेते यांना कोरोनाची लागण झाली नसेलच असे कशावरून?? आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर किमतीपेक्षा जास्त दराने व बंदी असतांनाच देखील मागील दाराने दारु विक्री करत आहेत.यामुळे कोरोना महामारी काळात काही दारु विक्रेते संधी साधून तगडी कमाई करत असून यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे.

बंदि असतांनाही काही वाईन शॉप कडून केल्या जाणाऱ्या दारु विक्री विषयी संशय व्यक्त केला जात असून सर्रास विक्री होत असलेली दारु बनावट दारु असल्याची शंका उपस्थित होत आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तपणे कठोर कारवाई करावी व या प्रकरणाचा पर्दाफाश करुन या बनावट दारु विक्री करणाऱ्या वाईन शॉप व टोळीला जेरबंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.