भारतीय नौदलात २५०० रिक्त जागांवर बंपर भरती ; १०वी, १२वी पास असणार्यांसाठी मोठी संधी

0

भारतीय नौदलात नाविक २५०० पदांवर बंपर भरती होत आहे. बारावी उत्तीर्ण झालेले तरुण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. भरतीविषयक सर्व माहिती या वृत्तात देण्यात आली आहे, सोबतच नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन फॉर्मची लिंकही देण्यात आली आहे.

पदांची माहिती

अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) – ५०० पदे

सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) – २००० पदे

एकूण पदांची संख्या – २५००

पे स्केल – २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये प्रति महिना पर्यंत

शैक्षणिक पात्रता

भारत सरकार / राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्कूल/बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी मॅथ्स, फिजिक्सचा अभ्यास आवश्यक. सोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.

वयोमर्यादा

भारतीय नौदल नाविक व्हेकन्सी 2021 साठी असे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचा जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असेल.

अर्ज कसा करायचा?

इंडियन नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे. जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना २१५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.

निवड प्रक्रिया

या पदांवरील निवड लेखी परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केली जाईल.

Indian Navy Sailor Recruitment Notification 2021 साठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा (लिंक २६ एप्रिल २०२१ रोजी अॅक्टिव्ह होईल.)

 

Leave A Reply

Your email address will not be published.