वर्षभरापासुन कोविड सेंटरला रुग्णांची ते भागविताहेत पाण्याची तहान

0

भडगाव (प्रतिनिधी) :  येथील आर.ओ.क्लीन अॅक्वा पाचोरा रोड भडगावचे संचालक शरद हिरे हे रुग्णांसाठी मागील वर्षापासुन सर्व कोविड सेंटरला  तर आताही भडगाव ग्रामीण रुग्णालय व शासकीय  आय. टी.आय कोविड सेंटर या दोन्ही कोविड सेंटरला पिण्याचे मुबलक पाणी सकाळ व सायंकाळ पुरवित आहेत. शहरात अनेक आर.ओ.अॅक्वा प्लंट असुन फक्त शरद हिरे हे पाणी पुरवित आहेत.

दोन्ही कोविड सेंटरला उपचार घेणार्या रुग्णांची पिण्याच्या पाण्याची तहान कोरोनाच्या कठीण काळातही भागवित आहेत. रोज ते पाण्याचे खाली असलेले जार स्वच्छ धुतात. नंतर त्या जारमध्ये ताजे आर ओचे पाणी भरतात. त्यांनी या अनमोल पाण्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शरद हिरे यांचे सर्वञ आभार मानले जात आहे. रोज ते रुग्णांची विचारपुसही करतात

Leave A Reply

Your email address will not be published.