राम नवमी निमित्ताने भडगाव येथे स्मशानभूमीत साफसफाई अभियान

0

भडगाव (प्रतिनिधी) : दरवर्षी रामनवमी निमित्ताने राममंदिर येथे उत्सव साजरा करण्यात येतो. नागरिक पूजाविधीसाठी येतात.  मात्र या वर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता शासनाने उत्सव बंद ठेवले आहे.

कोरोनाच्या कहर ने ही स्मशानभूमीत ओटे शिल्लक नाही. मोठी वेटींग आहे. त्या अभावी ठिकठिकाणी मिळेल तेथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे याठिकाणी अंत्यविधी दरम्यान साहित्य व इतर वस्तू, अंत्यसंस्कार नंतर ची राख पडून होती . परिसर अस्वच्छ होता.  म्हणून  येथील परिसरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भडगाव कडून दखल घेत आज दि २१ रोजी स्मशानभूमी साफसफाई करण्यात आली.

यावेळी विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा धर्म प्रसारक नाना हाडपे , तालुका प्रमुख विनोद पाटील, भडगाव शहर प्रमुख साजन पाटील ,उपशहर प्रमुख गोपाल वाडेकर, यशवंत नगर शाखा अध्यक्ष राहुल पाटील, बाळद रोड शाखा अध्यक्ष चेतन चौधरी, इंदिरा नगर शाखा अध्यक्ष पंकज धनगर आदींनी उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबविले.  या उपक्रमाची पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण नाईक यांनी दखल घेतली .

Leave A Reply

Your email address will not be published.