मुंबई-मंडुआडीह सुपरफास्ट विशेष सेवांमध्ये वाढ

0

भुसावळ (प्रतिनिधी)- 01101/01102  मुंबई-मंडुआडीह अतिजलद विशेष रेल्वेची सेवा द्वि-साप्ताहिक पासून आठवड्यातून चार दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालील प्रमाणे:

मुंबई-मंडुआडीह अतिजलद विशेष

01101 विशेष दि. २१.४.२०२१ ते १.५.२०२१ पर्यंत दर रविवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी २१.४५ वाजता सुटेल आणि मंडुवाडीह येथे दुसर्‍या दिवशी २२.४५ वाजता  पोहोचेल.

01102 विशेष दि. २१.४.२०२१ ते १.५.२०२१ पर्यंत मंगळवार, शुक्रवार, सोमवार आणि गुरुवारी ००.३५ वाजता मंडुवाडीह येथून  सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी 03.55 वाजता पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी.

संरचना : १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ८ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षणः पूर्णतः आरक्षित असलेल्या 01101  अतिजलद विशेष ट्रेनच्या वाढीव सेवांसाठी बुकिंग २२.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी

www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.