खामगावात घंटागाड्यांचे ध्वनीप्रदूषण

0

खामगाव (प्रतिनिधी)- शहरातील वस्त्यांमध्ये जावून घरोघरी साचलेला कचरा संकलन करण्याचे व्यवस्थापन करून प्रदूषण कमी करणार्‍या घंटागाड्यांनी आता मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण सुरू केले आहे. ’ स्वच्छ भारत का इरादा, कर लिया हमने…’ ही घंटागाडीच्या आगमनाची सूचना खूपच मोठ्ठ्या आवाजात आणि वारंवार दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. यापेक्षा या सूचनेची वारंवारिता कमी करून मधल्या वेळात सौम्य आवाजात भावगीते लावली तर नागरिकांना सुसह्य होईल, अशी मागणी होत आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात रोजच घंटागाडी कचरा संकलन करण्यासाठी येते, मात्र सध्या लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजात गाडी आल्याचे संकेत दिले जाते, परंतु गाण्याचा आवाज कमी ठेवून ध्वनि प्रदूषण कमी करावे, वेळ सकाळ ची असल्याने वरिष्ठ नागरिक व लहान बालकांना त्रास होतो. तरी संबंधीतांनी आवाज ची योग्य काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.