प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावचे कामकाज कौतुकास्पद-भडगावचे तहशीलदार- सागर ढवळे

0

कजगाव (प्रतिनिधी)- गेल्या एक वर्षापासुन कोरोनाच्या संकटाशी शासन व प्रशासन लढा देत आहे.कोरोना विरोधात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कोरोना रोखण्यासाठी दिवस-रात्र कार्य करीत आहे.कोरानाची दुसरी लाट भयावह असुन सर्वांनी शासकीय नियमांचे पालन केलेच पाहीजे.

असे आवाहन भडगाव येथील तहशीलदार सागर ढवळे यांनी केले आहे.त्यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव येथे भेट देऊन कजगाव येथे चालणाऱ्या कामकाजाबाबत आढावा घेतला.सदर आढावा ऐकुन तहशीलदार सागर ढवळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव यांच्या कार्याचा गौरव करुन कजगावचे कार्य कौतुकास्पद आहे.असे सांगुन गेल्या एक वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील,डाँ.स्वप्निल पाटील व त्यांची संपुर्ण टिम कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.याबाबतीत अधिक माहीती देतांना वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील यांनी सांगितले की कजगाव येथे नियमित स्वँब तपासणी होते.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव अंतर्गत गावांमध्ये कोरोना तपासणी कँम्पचे आयोजन करुन कोरोनाचे रुग्ण शोधले जातात.रुग्णांचा शोध लवकरात लवकर घेतल्यामुळे रुग्णांवर योग्य वेळी उपचार केले जातात.

तसेच कजगाव येथे कोरोना लसीकरणाचे कामही चांगल्या प्रकारे होत असुन आजवर हजाराच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे.सदरप्रसंगी कजगाव येथील पत्रकार निलेश पाटील सर,अमिन पिंजारी,आरोग्यसहाय्यक रमेश राठोड,औषध निर्माण अधिकारी उमेश महाजन,आरोग्य सेवक किरण पाठक,राजेश खैरनार,विकास चव्हाण,राजु महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.