लॉकडाऊन काळात जिल्हाबंदी होणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले….

0

मुंबई : राज्यात संचारबंदी लागू करुनही कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात 15 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ही घोषणा करु शकतात. दरम्यान, संपूर्ण लॉकडाऊन म्हणजे सार्वजनिक वाहतूक आणि जिल्हाबंदी होणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.

अशावेळी राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिलीय. लॉकडाऊनच्या काळातही रेल्वे, बससेवा सुरु राहील. तसंच जिल्हाबंदीही होणार नाही. पण सबळ कारणाशिवाय जिल्ह्यातून बाहेर पडता येणार नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.

राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. त्याबाबत काल मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.