भडगाव येथे अठरा रुग्णांनी मिळवला कारोनावर विजय

0

या मध्ये चार वृध्द तर एक बालकाचा समावेश

रुग्णांनी घाबरू नका कोरोनावर सहज विजय मिळवता येतो

भडगाव – प्रतिनिधी

भडगाव येथे दि १३ रोजी केवळ ४ कोरोना पॉझिटिव्ह, बरे होऊन डीचार्ज झालेल्या १८ रुग्णांमध्ये ४ वयोवृद्धांसह एका बालकाचा समावेश असल्याची असल्याची माहिती तहसीलदार सागर ढवळे व डॉ.प्रतिक भोसले यांनी दिली .
आरोग्य,महसूल,पोलीस, नगर पालिका, महिला बालविकास व पंचायत समिती विभागाच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या संख्येत मागील आठवड्यात झपाट्याने वाढ झालेली असली तरी दोन – तीन दिवसांपासून डीचार्ज झालेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. शिवाय प्राशसनाने टेस्ट व जनजागृती वर भर दिला आहे. त्यामुळे नागरिकांमधील दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचे भीतीचे वातावरण काहीसे कमी होण्यास मदत होणार आहे.

भडगाव तालुक्यात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर अठरा रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याचा वृध्द तर एक बालकाचा समावेश आहे .वृद्धांनाही कोरोनावर विजय मिळवता येतो यात घाबरण्याचे काही कारण नाही. डॉक्टरांच्या उपचारावर भरोसा आहेत असे मत वयोवृद्ध बरे झालेले रुग्ण व एका बालकाने यावेळी व्यक्त केले.

त्यामुळे इतरही रुग्णांनी सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे . शिवाय प्रशासन आवाहन करत असलेल्या बाहेर फिरणाऱ्या लोकांनी नियम पाळून घरात बसला पाहिजे. त्याने कोरोना झपाट्याने कमी होण्यास मदत होणार आहे.आज आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी द आमडदे २, गिरड १, कनाशी १ असे रुग्ण आहे.सद्यस्थितीला भडगाव येथे ९४ , ग्रामीण रुग्णालयात २२, आयटीआय ७२, इतर संदर्भित ६५ , ८२ रुग्ण गृह उपचार , २०५ अहवाल अप्राप्त आहे आतापर्यंत तालुक्यातील ३०४६ व्यक्तींची तपासणी झाली असून यात २६९४ लोकांना बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६९ मयत झाले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.