वाहतूक पोलिसाशी हुज्जत : गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील खडकारोड परिसरात तीन सीट फिरणार्‍या मोटर सायकलस्वारास थांबविले असता, पोलिसाशी हुज्जत घालून त्याच्या अंगावर धावून जात पोलिसाला मारल्याने शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्यावरील पोलिसाशी अरेरावी

खडकारोडवर शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण गंगाधर चाटे हे कर्तव्यावर असतांना गुरूवारी सायंकाळी 5.55 वाजता कृष्णाकुमार उदयसिंग हा त्याच्या मोटर सायकलीवर तीन सीट बसून जात होता. यावेळी पोलिसाने त्यास हटकले असता, त्याने पोलिसाशी हुज्जत घातली, पोलिसांच्या अंगावर धावून गेला. हल्ला करीत पोलिसाच्या गालावर चापट मारली. याप्रकरणी पोलिस चाटे याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार विरूध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कृष्ण भोये हे तपास करीत आहे.शहरात तीन सीट फिरणारे व धूम स्टाईल चालविणारे, आावाज करणार्‍या बुलेट, विना परवाना गाडी चालविणे, विना क्रमांकाने गाडी चालविणे यांच्यावर थेट कारवाई करा, कोणाचेही फोन घेऊ नका, अश्या सक्त सूचना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिल्या आहे. शहरात विशेष मोहिम राबवा आणि कारवाई करा, पोलिसांशी दादागिरी करणार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करा, अश्या सूचना केल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.