जामनेरला गायींची अवैध वाहतुक करणारे वाहन ताब्यात, ४ आरोपींवर गुन्हा दाखल

0

जामनेर प्रतिनिधी : परीसरातुन गायींची अवैध वाहतुक सुरूच असुन,   (९) सकाळी सहाच्या सुमारास काही सामाजीक कार्यकर्त्यांनी अशा अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेऊन शहराजवळील बोदवड चौफुली जवळ १४ गायी आणी वासरे पकडली,आणी पोलीसांना तातडीने खबर दिली.त्यामुळे पोलीस ठाण्यात ४ संशयीतांवर  गोपाल बुळे यांच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल होऊन दोन वाहनांना ताब्यात घेण्यात आले.त्यात एक आईसर गाडी नंबर आर .जे ०६/८४५३ ,अशोक लेल्यांड ट्रक एम. एच१०/सी. आर७४९१अशी ही वाहने ताब्यात घेण्यात आली.

इरफान मोहम्मद जलाल मोहम्मद,फारूख मोहम्मद उस्मान,शाहरूखखान अजीज मोहम्मद,आबीदहुसेन मुबारकहुसेन अशा चार जणांचा आरोपींमधे समावेश आहे.  गोपाल बुळे यांच्या फिर्यादी वरून या आरोपीन वर कलम ११(१),११९,१८३या नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोकॉ. विनोद पाटील करीत आहे.गोपाळ बुळे यांचेसह देवीदास इंदलकर,दिपक पाटील आदींचे यावेळी सहकार्य मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.