संतप्त व्यापारी उद्यापासून उघडणार दुकाने ; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन
भुसावळ (प्रतिनिधी)-
येथे महाराष्ट्र राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू होत आहे. अत्यंत भयावह अवस्था पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिनी लॉक डाऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या निर्णयास भुसावळ येथील बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशन, रजा टावर व्यापारी संघटना व भुसावळ शहर व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने या लॉक डाउनचा तीव्र निषेध करण्यात आला आहे तसेच उद्यापासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने उघडणार असल्याचाही निर्णय या संतप्त व्यापाऱ्यांनी घेतलेला असून याबाबत शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 8 रोजी भुसावळ प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले आहे . राज्य शासनाने त्वरित दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशन, रजा टावर व्यापारी संघटना व भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे साबिर शेख , जाकिर खान , अ रहीम अ रहेमान ,फिरोज रहेमान शेख , सिराज खा