टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा ‘हे’ फायदे

0

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

-टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.
-टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात,

-टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
-टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते.
-ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे.
व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.