जिल्ह्यात आज ११४१ नवे रुग्ण आढळले, १४ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होतांना दिसून येत नाहीय. जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज बुधवारी १ हजार १४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासादायक असे की आजचं १ हजार ०७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत ९७ हजार ९९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८३ हजार ६७१ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. तर ११ हजार ७०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृताच आकडा १७२६ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १६८, जळगाव तालुका २७, भुसावळ १०२, अमळनेर ५३; चोपडा ७९; पाचोरा १२१; भडगाव ३२८; धरणगाव ५५; यावल ६२; एरंडोल ४१, जामनेर ४४; रावेर ८८, पारोळा ३७; चाळीसगाव ३२, मुक्ताईनगर ९२; बोदवड १०३ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे ११४१ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.