शेतकऱ्यांना बारा दिवस जेलमध्ये डांबणाऱ्या तिघाडी सरकारचे आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी घातले तेरावे

0

 चाळीसगाव:-(प्रतिनिधी ) चाळीसगाव तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ येथे सामुहिक मुंडन करून शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले.

यावेळी भटजी बुवांच्या हस्ते तीन पाय असलेल्या खुर्चीवर तिघाडी सरकार – भावपूर्ण श्रद्धांजली नाव असलेला फोटोची विधिवत पूजन करत महाविकास आघाडीचे श्राद्ध देखील घालण्यात आले. शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार हाय – हाय, तिघाडी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

सदर मुंडन आंदोलन प्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी कृउबा सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पियुष साळुंखे, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नगरसेवक बापू अहिरे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल यांच्यासह आंदोलक शेतकरी व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंडण आंदोलन स्थळी जात असताना रस्त्यात खरजई, तरवाडे, न्हावे – ढोमणे, बहाळ येथील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा अडवत त्यांचा सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.