पत्नीने केला पतीचा गळफास देवून खून; गोंडखेळ येथील घटना

0

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोंडखेळ येथील महिलेने पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गळफास देवून खून केल्याची घटना काल(६)रोजी रात्री साडेअकरा- बारा वाजेच्या सुमारास घडली.मयत पती दिलीप विश्वनाथ सोनवणे (वय३५) राहणार गोंडखेळ यांचा मृत्यू झाला असून. कल्पना युवराज जाधव यांच्या फिर्यादी वरून आरोपी मयताची पत्नी संगीता दिलीप सोनवणे (वय ३२) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्तअसे की मयत दिलीप सोनवणे आणि आरोपी संगीता सोनवणे हे दोघे पती-पत्नी आहे. मयत पती हा आरोपी पत्नी संगीतावर संशय घेवून पाप लावत असतो या कारणावरून आरोपी हिने रात्री पती झोपलेला असतांना दोरीने गडफास लावून खून केला. मयताची बहीण कल्पना युवराज जाधव राहणार गोंडखेड यांच्या फिर्यादीवरून मयताची पत्नी आरोपी संगीता दिलीप सोनवणे(वय ३२)यांच्या वर जामनेर पोलिसात कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.