कोरोना तपासणी ला नागरिक जुमानत नाही पॉझिटिव्ह निघणार याची धास्ती

0

जळगाव:- कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर आपल्याला क्वॉरंटाइन करतील या भीतीने तालुक्यातील अनेक लोक चाचणीपासून पळ काढतात. अशाने संसर्ग अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या चाचणीला नागरिकांनी अजिबात घाबरू नये, चाचणी करून घ्या, कोरोनाचा रूग्ण पूर्णपणे बरा होतो असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञ देत आहेत. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यात अनेकांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून येत असताना देखील केवळ क्वॉरंटाइन व्हावे लागेल या भीतीपोटी अनेक नागरिक कोरोना संसर्गाची चाचणी करण्यास टाळाटाळ करत आहेत.

अनेक जण घाबरुन टेस्ट न करता आयसीयूबेडची वाट बघण्यापेक्षा आधीच कोरोना टेस्ट करा आणि औषध घ्यावी एका व्यक्तीच्या चुकीमुळे अनेकांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा आजार लपवण्यासारखा नाही. पण दुर्दैवाने आज तसे प्रकार घडत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही असे रुग्ण आहेत की, ज्यांना ताप असताना देखील सांगत नाहीत. नंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर उपचार करतात. अशावेळी डॉक्टर देखील काही करू शकत नाही. असे डॉक्टर सांगतात. कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही. टेस्ट करून घेणे आणि उपचार करणे हेच ही साखळी तोडण्याचे एकमेव माध्यम आहे. जर हा आजार लपवलात या आजाराचा अंत नाही. त्यामुळे लक्षण आढळली की लगेच टेस्ट करून उपचार करुन घ्यावे,
असेआवाहन आरोग्य विभागाच्या
वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.