पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांच्याकडून शहरातील बाजारपेठ आणि व्यापार संकुलांची पाहणी

0

जळगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज शहरातील बाजारपेठ आणि व्यापार संकुलांची पाहणी करून अनावश्यक सुरु असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिल्या. तसेच नागरिकांकडून कडक निर्बंधांचे पालन होते कि नाही याचाही आढावा घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर आज ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शहरातील सुभाष चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणबाजार, गोलाणी मार्केट परिसरात पाहणी केली.

याप्रसंगी उपायुक्त संतोष वाहूळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. विठ्ठल ससे, पोहेकॉ विजय निकुंभ यांच्यासह महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.