अमरावतीतील लॉक डाऊन ला विरोध करण्यासाठी व्यापारी व कामगारांची महापालिकेवर धडक

0

अमरावती (प्रतिनिधी) : सततच्या टाळेबंदी मुळे बाजारपेठांमधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .अशा परिस्थितीत कोरोनामुळे नव्हेतर उपासमारीने मरण्याची वेळ कामगारांच्या कुटुंबावर आलेली असल्याने .शहरातील बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीकरिता . बाजारपेठांमधील दुकानांमध्ये काम करणारे शेकडो कामगारांनी 6 एप्रिल रोजि महानगरपालिकेवर धडक दिली.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने. राज्य शासनाने अमरावती सह संपूर्ण राज्यातील अत्यावश्यक सुविधा व हॉटेल्स रेस्टॉरंट वगळता सर्व प्रतिष्ठान करिता टाळेबंदी चा आदेश दिला आहे .राज्य शासनाच्या या आदेशाची अमरावती जिल्ह्यात सुद्धा काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने .अमरावती शहरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने सोमवार रात्रीपासून बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा व हॉटेल्स रेस्टोरेंट वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने पुन्हा बंद ठेवण्याची वेळ संबंधित व्यावसायिकांवर आलेली आहे.

कोरोणाची पहिली लाट जेव्हा गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरू झाली त्यावेळी केंद्र सरकारने तीन महिन्याचा लाॅकडाउन घोषित केला होता. त्यावेळी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद होती. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे व पर्यायाने दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुन्हा पंधरा दिवसाच्या कडक लॉक डाऊन घोषित केला . त्यावेळी सुद्धा शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव अमरावती वगळता राज्यातील ईतर भागात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने. राज्याने सरसकट संपूर्ण राज्यातच 5 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सरसकट टाळेबंदी घोषित केली आहे.

अमरावती जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी लावलेल्या टाळेबंदीमुळे कोरोणा बाधितांची संख्या नियंत्रणात आली असतानासुद्धा .अमरावती जिल्ह्यावर पुन्हा लॉक डाऊन लादण्यात आला असल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी या ताळेबंदिला अगोदरच आपला विरोध दर्शविला आहे .असे असतांना आता शहरातील बाजारपेठांमधील बंद करण्यात आलेल्या प्रतिष्ठानां मधील कामगारांनी सुद्धा या लाॅक डाऊनला आपला विरोध दर्शविला आहे.

सत्याग्रह शेतकरी संघटनेचे नेते आनंद आमले यांच्या नेतृत्वाखाली लाॅक डाऊन मुळे बंद असलेल्या दुकानात काम करणाऱ्या शेकडो कामगार युवकांनी राजकमल चौकात एकत्र येत. अमरावतीतील लाॅकडाउन चा विरोध केला.

व्यापारी प्रतिष्ठाने पुन्हा एकदा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याने या कालावधीत कोणताही व्यवसायिक हा कामगारांना वेतन देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा आता कोरोनानेच मरु द्या अशी आर्त हाक देत या कामगारांनी महानगरपालिकेत धडक दिली. या कामगाराचे नेतृत्व करणाऱ्या आनंद दामले यांनी महापालिका उपायुक्त रवी पवार यांच्याशी चर्चा करून शहरातील व्यवसायिक प्रतिष्ठानांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो कामगारांचा पोटापाण्यासाठी अमरावती शहरावर लादण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात यावा व सर्व प्रतिष्ठान यांना व्यवसायाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर उपायुक्त रवी पवार यांनी कामगारांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले . यावेळी अमर ठाकूर , अमर सबरवाल ,मंगेश तांबे, हर्षद खान वसीम खान, सुनील कडू ,गजानन महल्ले, कमलेश चौधरी, दिनेश कोतवाल ,रवी बाहेकर, दिलीप बाहेकर, राजेश मोहाडीकर, स्वप्निल नवले, निलेश टाले ,अहसान सय्यद ,मंगेश भरती, प्रशांत आठवले ,यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व प्रतिष्ठानातील कामगार युवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.