पहुर पोलीस स्टेशनला नवीन वाहन झाले दाखल

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पहुर पोलीस स्टेशनला सोमवारी नवीन वाहन मिळाले असुन त्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे हस्ते पुजन व श्रीफळ वाढवुन स्वागत करण्यात आले.

पहुर पोलीस स्टेशनची फार मोठी हद्द आहे. सध्याच्या वाहनाची अवस्था फारच बिकट होती. अनेक वर्षापासून नवीन वाहन मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या कडे प्रस्ताव सादर केला होता. याची दखल घेत हे नवीन वाहन मिळाले आहे.

पो.नि.राहुल खताळ यांनी सपत्नीक या नवीन वाहनाची पुजा केली.यावेळी पोउनि. किरण बर्गे, पोउनि. अमोल देवडे,अँड. एस.आर.पाटील, अँड. देवेंद्र पारळकर, सुरेश जोशी, सलिम शेख,विनय सानप,ईश्वर देशमुख, जवानसिंग राजपुत, ज्ञानेश्वर ढाकरे,अनिल देवरे तसेच मान्यवर पोलीस कर्मचारी व त्याच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.