देशात २४ तासांत ९६,९८२ नवे करोनाबाधित, ४४६ मृत्यू

0

नवी दिल्ली : सोमवारी कोरोना संक्रमणकाळातील आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आल्यानंतर आज हा आकडा थोडा खाली घसरलेला दिसतोय. देशात गेल्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी २६ लाख ८६ हजार ०४९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी १७ लाख ३२ हजार २७९
उपचार सुरू : ७ लाख ८८ हजार २२३
एकूण मृत्यू : १ लाख ६५ हजार ५४७
लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या : ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६

देशात आतापर्यंत ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६ नागरिकांना लस देण्यात आलीय. यातील ४३ लाख ९६६ नागरिकांचं लसीकरण काल (सोमवारी) पार पडलं. दरम्यान, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर पडलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी यांसदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. ही बैठक सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.