लॉकडाऊन लावण्याआधी सर्वसामान्य कुटुंबियांना मदतीची घोषणा करावी -फैजपूर येथील कामगारांची मागणी

0

फैजपूर प्रतिनिधी: एम मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटी रजि न JAL 75/19 असंघटीत गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना फैजपूर अध्यक्ष शाकिर मलिक यानी पुन्हा लाकडाऊन लावण्यात आले तर आमचे हे मागण्या शासन ने मान्य करावे अशी अपेक्षा शासना कडे निवेदन द्वारे केली.

लॉकडाउन लावाच..! शासन हे केविड 19 पासून बचाव साठी जनतेच्या हिता साठी करीत आहे हे मान्य आहे.तरी आमचे सारखे साधारण जे रोज कामे करून आपले व आपले परिवार चे पालन पोषणासाठी दिवस रात्र मोल मजुरी करून परिवार चे पालन पोषण साठी संघर्ष करतो ईमारत बांधकाम,शेतकरी,मजुर ,पेंटर,बेकरी कामगार,मोटर सायकल वाहन मेकनिक,मटण विक्रेते,मेकनिक,पान टपरी चालक,हमाल,चहाठेलेवाले,हाटेल वाले,केळी फ्रुट सबजी,वीट भट्टी वर काम करणारे,भाजी वाले व सर्व कामगार यांच्यासाठी शासनाने लॉकडाउन लावण्याआधी या सर्व कामगार वर्गाला शासनाकडून पुढीलप्रमाणे मदद जाहीर करावी.
१)प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.२) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे साबून सहित घरगुती रोज लागणारे साहित्य घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंचपक्वानांची अपेक्षाच नाही.३) किमान ३ महिने घरगुती गॅस मोफत द्या.४)लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत बजाज फायनेस उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.५) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडवला आहातच मग शैक्षणिक फी माफ कराल हे देखील जाहीर करा.6) नगरपालिकेच्या नळ,घर पट्टी माफ करा,दुकानदार चे भाडे माफ करा
लोक सेवक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळ यांनी या मागणीकडे लक्ष देऊन मग निर्णय घेतला पाहिजे की एक साधारण माणूस काय करणार? सरकारी अधिकारी कर्मचारी यांचे पूर्ण लाकडाऊन शासकीय निम शासकीय कर्मचारी यांचे वेतन सुरू आहे.तर आमचे कामगारां चे काय? आम्ही संविधान कायदे चे पालन करणारे आहे परंतु गेल्या वर्षी पासून आमचा वरच का अन्याय तरी अता पुन्हा लाकडाऊन लागले तर आम्ही रस्त्यावर येऊ आमचे वर गुन्हे दाखल झाले तरी चालेल कमीत कमी जेल मध्ये दोन वेळी जेवण मिळेल ही शासनाने आमची मागणी ची दखल घेऊन विचार करावे ही आमची विनंती
आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला आमच्या नशिबावर जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका.जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.
अशा प्रकारे कामगार दुकानदार व नागरिक फैजपूर यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.