मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे

0

ऑस्टियोपोरोसिससारखे आजार हाडे कमजोर झाल्यामुळे होतात. आपले शरीर सतत जुन्या हाडांच्या टिश्यूला नव्यामध्ये रूपांतरीत करते, तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये, नवीन हाडांची निर्मिती उशिरा होते. यामुळे मुख्यतः वृद्ध किंवा स्त्रियांना नुकसान पोहचवते, परंतु आजकाल ही समस्या अगदी तरुणांमध्येही सामान्य झाली आहे. परंतू आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असतील तर हाडे मजबूत होतील. मग गुडघे दुखण्याचा विकारही दूर ठेवता येतो. म्हणून हाडे मजबूत करणारे पदार्थ कोणते ते पाहूया…

 हंगामी फळे खा

ही चिंतेची बाब आहे कारण ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त लोकांना किरकोळ टक्करनेही गंभीर दुखापत होऊ शकते आणि आराम मिळण्यास बराच काळ लागू शकतो. जर आपल्यालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर समस्या अधिक वाढण्यापूर्वी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. या व्यतिरिक्त काही हंगामी फळांचे सेवन करुनही हाडे मजबूत करु शकता. ही फळे नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्यासाठी ओळखली जातात. मजबूत हाडांसाठी आपण उन्हाळ्यातील काही फळे खावी.

सफरचंद

सफरचंद हे वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे. सफरचंदामध्ये हाडांसाठी आवश्यक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे दोन घटक कोलेजन तयार करण्यासाठी आणि नवीन हाडांना उत्तेजन देण्याचे काम करतात.

पपई

हे गोड फळ उष्णता सहन करण्यास सक्षम बनवते. चांगली गोष्ट म्हणजे पपईं आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सीने युक्त पपई खाल्ल्याने तुमची हाडे, त्वचा आणि प्रतिकारशक्तीवर चांगले परिणाम होऊ शकतात.

अननस

हे आंबट-गोड फळ पोटॅशिअमने भरलेले आहे. संशोधनानुसार, पोटॅशिअमचा वापर अॅसिडचा परिणाम कमी होण्यास मदत करू शकतो आणि अशा प्रकारे कॅल्शिअमची कमतरता काही प्रमाणात कमी होऊ शकते. याशिवाय हे व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे दोन्हीही मजबूत हाडांसाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत.

स्ट्रॉबेरी

ही सुंदर लाल बेरी ताजेपणाने भरलेली असते आणि हे खाल्ल्याने आरोग्यास बरेच फायदे मिळतात. स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे हाडांचे नुकसान होण्यास कारणीभूत फ्री रेडीकलच्या नुकसानाविरोधात लढायला मदत करतात. या व्यतिरिक्त हे फळ कॅल्शिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहेत. हे सर्व नवीन हाडांच्या निर्मितीस मदत करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.