भुसावळात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0

भुसावळ | प्रतिनिधी 

शहरातील मुस्लीम कॉलनीतील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शबनम बी.हसन शहा (26 मुस्लीम कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहिता शबनम पती व दोन मुलांसह वास्तव्यास होती. शनिवारी नेहमीप्रमाणे पती हसन शहा हे गवंडी निघाल्याने पत्नीने त्यांना डबा बनवून दिला मात्र काहीच वेळात विवाहिता शबनम यांनी घरातील लोखंडी पाईपाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. विवाहितेने नेमकी आत्महत्या कुठल्या कारणावरून केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, संदेश निकम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.